NSMNY
NSMNY: नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेच्या पार्श्वभूमीवर आधारित महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असून, असून महाराष्ट्रातील लघु व मध्यम क्षेत्रफळ असलेल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी तसेच शेतीसाठी आवश्यक असलेल्या अवजारे, बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके इत्यादी खरेदी करण्यास शेतकऱ्यांना हातभार लागणार आहेत.
शासन निर्णय :- महाराष्ट्र विधानसभेत या योजनेची घोषणा माननीय अर्थमंत्र्यांनी केली होती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी १००% अर्थसहाय्य महाराष्ट्र कृषी विभागाचे असून, शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अधिकृत जीआर शासन निर्णय क्रमांक किसयो - २०२३/प्र.क्र.४२/११-अ दिनांक : १५ जून २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला. त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२३०६१५१७४५५१३१०१ असा आहे.
महा DBT :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी प्रति वर्ष ६०००/- रुपये तीन हप्त्यात २०००/- रुपये प्रमाणे लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण DBT (Direct Benefit Transfer) अंतर्गत वर्ग केले जातात.
पीएम-किसान योजनेच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली असून, दिनांक : २६ ऑक्टोंबर २०२३ रोजी योजनेचा पहिला हप्ता माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते शिर्डी येथील आयोजित एका कार्यक्रमा दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली.
अर्थ सहाय्य :- 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' ही महाराष्ट्र शासनाची असून, राज्य शासनाचे १००% अर्थसहाय्य आहे. तसेच, पीएम किसान ही केंद्र शासनाची योजना केंद्र शासनाचे १००% अर्थसहाय्य देण्यात येते. या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात अनुदान वर्ग करण्याची पद्धती सारखी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १२०००/- रुपये मिळणार आहेत.
संनियंत्रण :- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अनुदान वितरित करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात आली आहे. नियंत्रणासाठी ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आले आहे.
कार्यपद्धती :- हफ्ते वितरित करण्याचा कालावधी पहिला हप्ता एप्रिल - जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट - नोव्हेंबर आणि तिसरा हत्या डिसेंबर - मार्च दर चार महिन्यांनी २०००/- रुपये असे एकूण ६०००/- रुपये एका वर्षात लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) अंतर्गत वर्ग करण्यात येतात.
पात्रता :- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र व अपात्र मापदंड ठरलेले असून "प्रधानमंत्री किसान महा निधी" योजनेसाठी पात्र असलेले महाराष्ट्रातील सर्व शेतकरी पात्र असणार आहेत.
१. भारतीय शेतकरी कुटुंबातील कुटुंब प्रमुख किंवा १८ वर्षांवरील व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतो.
२. लाभार्थी व्यक्तीच्या नावे शेतजमीन असणे किंवा सामाईक जमीन असल्यास "ना हरकत प्रमाणपत्र" आवश्यक.
३. योजनेचा लाभ घेण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण असल्याने लाभार्थ्यांकडे आधार लिंक बँक खाते असणे.
४. आधार क्रमांक आणि ब्राह्मण ध्वनी क्रमांक लिंक असणे गरजेचे राहील आणि पोर्टलवर नोंदणी करणे आणि लाभार्थ्यांचे अद्ययावत माहिती देणे बंधनकारक राहील.
५. कृषि मंत्रालय, महाराष्ट्र सरकार यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करणे बंधनकारक राहील.
अपात्रता :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अपात्र असलेले महाराष्ट्रातील सर्व शेतकरी "नमो शेतकरी महासन्मान निधी" योजनेस अपात्र असणार आहे.
१. सर्व संस्थात्मक जमीनधारक व संवैधानिक पद धारण करणारे किंवा केलेले आजी व माजी व्यक्ती.
२. आजी व माजी लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य, आजी व माजी विधानसभा किंवा विधान परिषद सदस्य, आजी व माजी महानगरपालिकेचे महापौर, आजी व माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष.
३. शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांच्या सर्व अधिकारी किंवा कर्मचारी. (चतुर्थ श्रेणी किंवा गट "ड" वर्ग कर्मचारी वगळून)
४. सर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक वेतन रुपये १०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे. (चतुर्थ श्रेणी किंवा गट "ड" वर्ग कर्मचारी वगळून)
५. मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्तीं शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.
६. नोंदणीकृत व्यवसायिक, चिकित्सक, वकील, सनदी लेखापाल, अभियंता, वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती. Maha NSMNY
